Sunday, April 13, 2008

रिलॅक्सेशन

संगीत उपचार पद्धतीएखाद्या अचानक घडलेल्या घटनेचा मानसिक धक्का (विशेषतः भावनेचा उद्रेक होऊन सतत रडणे किंवा हसणे) बसलेल्या व्यक्तीला दरबारी कानडा आणि पूरिया रागांच्या साहाय्याने सर्वसाधारण पातळीवर आणता येते। तर उच्च रक्तदाब असलेल्या (हायपरटेन्शन) व्यक्तींसाठी अहिरभैरव, पूरिया आणि तोडी राग उत्कृष्ट असल्याचं सिद्ध झाले आहे. विकलांग मुलांवर विविध राग आणि तालांच्या योग्य मिलाफातून उत्तम परिणाम साधता येतो, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. डोकेदुखी दूर करून शरीरात तरतरी आणण्यासाठी दरबारी कानडा, जयजयवंती आणि सोहनी रागांची शिफारस केली जाते तर दीप (ऍसिडिटी), गुणकली आणि जौनपुरी (अत्यंत थकवा, चेहरा पांढरा पडणे, गलितगात्र होणे आदी विकारांवर) तर मालकंस (ताप कमी करण्यासाठी)
उपयोगी ठरत असल्याचे डॉ। टी. साईराम यांनी प्रयोगातून सिद्द केले आहे.

No comments: