Sunday, April 27, 2008

उनकी खुबसुरतीका राज... (२७ अक्टोबर २००७ - सकाळ )

सौंदर्य हे स्त्रियांचे सामर्थ्य आणि सामर्थ्य हे पुरुषांचे सौंदर्य, असं म्हणतात। पण ते आता अर्धवट खरं म्हणायला हवं। कारण सध्या अशी काही कार्यक्षेत्रं निर्माण झाली आहेत, ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांच्याही सौंदर्याला अधिक महत्त्व आलं आहे। जाहिरात क्षेत्रापासून हवाई कंपन्यांसह स्टार हॉटेलांमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येकाची सुंदर दिसणं ही गरज झाली आहे। कलाकारांना सध्या चित्रपटांपेक्षा जाहिरातीतून अधिक उत्त्पन्न मिळू लागले आहे। कलाकाराच्या अभिनयकौशल्यापेक्षा त्याच्या दिसण्याला महत्त्व आले। आणि म्हणूनच सध्या स्त्री आणि पुरुषांना आपलं सौंदर्य टिकविण्याची आणि ते वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे। या गरजेतूनच कॉस्मेटिक सर्जरी करून कृत्रिम आणि नैसर्गिक सौंदर्याचा योग्य मिलाफ साधण्याचं प्रमाण वाढलं आहे। विशेषतः नोकरी करणाऱ्या तीस ते चाळीस वर्षं वयादरम्यानच्या स्त्रियांमध्ये हे प्रमाण अधिक आहे। कॉस्मेटिक सर्जरीचे अनेक प्रकार आहेत। साधारणपणे अधिक वेळ न लागणारी आणि दुष्परिणाम नसलेल्या सर्जरीला स्त्रियांची पसंती असते। एका सर्वेक्षणानुसार मुंबई, बंगळूर, दिल्ली या मेट्रो सिटींमध्ये हे प्रमाण वाढलेले आहेच; पण गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातही कॉस्मेटिक सर्जरी करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. केवळ नोकरी करणारे स्त्री-पुरुषच कॉस्मेटिक सर्जरी करून घेतात, असा तुमचा समज अल तर तो साफ चुकीचा आहे. यात अनेक उद्योगपती आणि गृहिणींचाही समावेश आहे. गृहिणी असलेल्या ऊर्मिला शर्मा म्हणाल्या, ""वेगवेगळ्या समारंभांना पतीसोबत मला जावं लागतं. काही वेळा मी परदेशातही गेले आहे. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी मी ही ट्रिटमेंट घेण्यास सुरवात केली. आफ्टर ऑल ब्यूटी इज ब्यूटी...''चेहऱ्यावरील वाढलेल्या सुरकुत्या बोटक्‍स ट्रिटमेंटद्वारे अवघ्या चोवीस तासांत नाहीशा करता येतात. उश्रीीींळवर्ळीा ईीीेंश्रळर्पीा नावाच्या बॅक्‍टेरियाकडून निर्माण केलेल्या ईीीेंश्रळर्पीा ीुेंळप ढूशि अ या रसायनाच्या शुद्ध प्रकारालाच बोटक्‍स (ईुें) म्हणतात. हे एक औषधी उत्पादन आहे. या ट्रिटमेंटमध्ये इंजक्‍शनद्वारे हे रसायन चेहऱ्यावरील ज्या भागावरच्या सुरकुत्या नाहीशा करावयाच्या आहेत, तेथील मांसल (रक्तवाहिन्यांमध्ये नाही) भागात दिले जाते. अवघ्या पंधरा मिनिटांत ही ट्रिटमेंट पूर्ण केली जाते. त्यानंतर संपूर्ण परिणाम दिसण्यासाठी चोवीस तासांपासून सात दिवसांपर्यंतचा काळ लागतो. नाक अणि गाल यामध्ये दिसणाऱ्या सुरकुत्या, किंवा दोन भुवयांमधील सुरकुत्या, अथवा गालावरील खळीसुद्धा काही वेळा चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा आणते. हे सर्व दोष या बोटक्‍स ट्रिटमेंटद्वारे दूर केले जातात. याने चेहरा अगदी तजेलदार दिसायला लागतो. मात्र ही ट्रिटमेंट तात्पुरत्या स्वरूपाची असून, ती तीन ते चार महिने टिकून राहते. एका वेळी साधारणपणे पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत याचा खर्च येतो. पुन्हा परत त्या सुरकुत्या घालविण्यासाठी ही ट्रिटमेंट घ्यावी लागते. सध्या बहुतेक शहरांमध्ये विविध कंपन्यांचे ब्यूटी क्‍लिनिक सुरू झाले आहेत. त्या सर्व शाखांमधून ही ट्रिटमेंट केली जाते. परंतु तज्ज्ञ डॉक्‍टरांकडूनच ही ट्रिटमेंट करून घेणे उत्तम. कॉस्मेटिक सर्जन डॉ. पराग सहस्रबुद्धे म्हणाले, ""सध्या पुण्यात कॉस्मेटिक सर्जरी करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण चेहऱ्यावरील सुरकुत्यांबाबत समस्या घेऊन येतात. तेव्हा त्यांना ही ट्रिटमेंट सागितली जाते. याउलट अनेक स्त्रिया स्वतःच या ट्रिटमेंटची मागणी करतात. पण या ट्रिटमेंटमध्ये रसायनाचा खूप काळजीपूर्वक वापर हवा.'' कोणत्याही ब्यूटी ट्रिटमेंटमध्ये रसायनाचा अधिक वापर झाल्यास ऍलर्जी किंवा चेहऱ्याच्या पॅरॅलिसिससारख्या परिणामांची शक्‍यता असते.

बोटक्‍स ट्रीटमेंट...
- चेहऱ्यावरील सुरकत्यांवर ही ट्रीटमेंट उपयोगी
- अवघ्या पंधरा मिनिटांत पूर्ण- तीन ते चार महिने परिणामकारक
- तीनशेपासून दोन हजार रुपयांपर्यत खर्च
- यात रसायनांचे प्रमाण योग्यच हवे

संभाजी देशमुख

हिरा है सदा के लिए... (२० अक्टोबर २००७- सकाळ )


दागिने- तेही सोन्या-चांदीचे... हा ट्रेंडच बदलून गेलाय। सध्याचा तरुणांचा कल हिऱ्यांच्या दागिन्यांकडे अधिक। काही वर्षांपूर्वी सोन्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या स्त्रियाही हिऱ्यांच्या दागिन्यांचा हट्ट करताना दिसतात। आपल्या आवडीच्या व्यक्तीला ब्रॅंडेड हिऱ्याच्या दागिन्याचीच भेट देऊन, एखादा प्रेमळ धक्का द्यावा, हे तरुण मनाचे स्वप्न। यापूर्वी हिऱ्यांचे दागिने पाहण्यासही मिळत नसत। पण देश जसा तरुण (तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे बरं का!) झाला, तसा संपूर्ण बाजार बदलला।यापूर्वी सर्व खरेदी संपूर्ण विश्‍वासावर चालायची. त्या वेळी हिऱ्याची पारख करणारा, खरा सराफ म्हणून ओळखला जाई. पण आता कॅरोटोमीटरच्या साहाय्याने आपण घेत असलेला हिऱ्याचा दागिना आणि त्याची गुणवत्ता, दर्जा लगेच कळतो. त्यात दागिन्यांचा इन्शुरन्स कंपन्यांकडून दिला जात असल्यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होते. खरेदीच्या या मूलभूत घटकांबरोबरच दागिन्यांच्या डिझाईनमध्ये प्रचंड प्रकार आहेत. तुम्हाला हवे तसे, हवे तिथे. हिऱ्यांचे दागिने देण्याची कंपनीची तयारी असते. एवढंच काय, तर काही कंपन्या तुमच्या दागिन्यांची डिझाईन तुम्हीच करा, तसे दागिने आम्ही तयार करून देऊ, असा एक "ऑप्शन' समोर ठेवतात. एवढ्या सर्व गर्दीतून आपल्याला आवडीचा दागिना घ्यायचा, म्हणजे त्याला सौंदर्य दृष्टीनं नटलेलं तरुण मन हवं. बरं तो दागिना स्वतःसाठी खरेदी करावयाचा असेल तर निवड करण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. पण तो भेट द्यायचा असेल तर... उफ!...ते मात्र तुम्हीच ठरवा.

हिऱ्यांच्या दागिन्यांचे
प्रकारहिऱ्यांच्या दागिन्यांत प्रकार तरी किती। सर्व पारंपरिक दागिन्यांमध्ये हिऱ्यांना स्थान देण्यासाठी आणि ते लोकप्रिय करण्यासाठी ज्वेलर्स दिवसरात्र झटत असतात। पेडंट्‌स, नेकलेस, इअरिंग्ज, रिंगज्‌, ब्रासलेट या ढोबळ प्रकारांमध्ये दररोज एका नवीन डिझाईनची भर पडतेय. आता केवळ पेडंट्‌समध्ये क्रॉस, हर्ट, ड्रॉप, तर इअरिंग्जमध्ये स्टड, हुप, ड्रॉप, कंन्टंप्रेरी. बापरे... रिंग्जमध्ये पुन्हा गोल हिरा, चौकोनी हिरा इथपासून ते एन्गेजमेंट रिंग, इटरनिटी रिंग, ट्रॉयलॉजी, ड्रेस, वेडिंग रिंग ...ब्रासलेटमध्ये टेनिस, बॅंगल, कंटेंप्ररी...इ.



आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्‌स
सध्या भारतात जोरदार जाहिरातींसह किमान 27 वेगवेगळे आंतरराष्ट्रीय ब्रॅंड उपलब्ध आहेत। त्यात तनिष्कपासून ते नक्षत्र, आष्मि, संगिनी, ट्राय, सेन्टो, सत्त्व, प्रिंसेस प्लस, कपीओ, डिझाईन कट, प्रिस्टाइन हर्ट, केअरसा, लिली डायमंड, क्रिस कट, स्टार 129, क्वीन ऑफ हर्टस, रॉयल अशेर, हर्टस्‌ ऑन फायर, इलरा, लवमार्क, अशोका, लुसिडा, किमोरा, महाराजा, अडोरा, गिली।





संभाजी देशमुख

Monday, April 21, 2008

"कफ' प्रकृतीसाठी व्यायाम 9 एप्रिल २००८ (सकाळ )

कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये मुळातच सहनशक्ती अधिक असते। कोणतीही गोष्ट सहजपणे घेणे, हा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे या व्यक्ती अतिताणतणावाच्या परिस्थितीतही खूप शांतपणे काम करू शकतात. म्हणून अशा व्यक्तींना अतिजड व्यायामाची (जिम वर्क आऊट) शिफारस केली जाते. मात्र त्याबरोबर शरीरात स्फूर्ती टिकून राहिल, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी खेळ वर्गीय प्रकार म्हणजे धावणे (लांब पल्ला उदा. मॅरेथॉन), स्वीमिंग, टेनिस, ऍरोबिक्‍स, जिम्नॅस्टिक्‍स, सायकलिंग (लांब पल्ला) त्यांना अधिक फायदेशीर ठरतात. स्नायूंच्या अधिक वाढीसाठी अतिजड व्यायाम (किंवा शरीरसौष्ठवसाठी) करण्याच्या प्रयत्नातून या व्यक्ती उच्च कामगिरी पार पाडू शकतात. पण अतिजड व्यायाम करून संपूर्ण थकून जाण्यापेक्षा व्यायाम आणि खेळ याचा मिलाफ सामान्यांना केव्हाही लाभ दायकच. बेसबॉल, फुटबॉल, हॉकी, तिरंदाजी, अश्‍वारोहण अशा खेळांतही कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी रस दाखवावा.

पित्तप्रकृतीसाठी व्यायाम 8 एप्रिल २००८ (सकाळ)

आयुर्वेदात पित्तप्रकृतीच्या व्यक्ती कायम "हॉट' असतात। त्यांच्या शरीराचे तापमान हे वात प्रकृतीच्या व्यक्तींपेक्षा थोडेसे अधिक असते. यांचे नाक आणि डोळे अधिक तीक्ष्ण असतात. अशा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी व्यायाम कशा प्रकारे करावेत, याबाबत या काही टिप्स.1) या व्यक्तींचा दम (स्टॅमिना), ताकद आणि वेग वाढविणारे खेळ किंवा व्यायाम प्रकार निवडण्यास अधिक फायदेशीर ठरते. 2) रॉक क्‍लायंबिंग, स्काय डायव्हिंग, आईस स्केटिंग, वेट लिफ्टिंग, स्वीमिंग अशा प्रकारांमध्ये पित्त प्रकृतीच्या व्यक्ती अधिक एकाग्रतेने कार्य करीत असतात. 3) मात्र पित्तप्रकृतीच्या व्यक्तीने शरीरातील ऊर्जा (हीट) संतुलित करण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. किंबहुना ही ऊर्जा कमी करणारे (कूलिंग स्पोर्टस) प्रकार निवडल्यास उपयोगी ठरतात. अनेकांना कठीण व्यायामाचा कंटाळा येतो, त्यांनी स्किईंग, स्वीमिंग, रॅकेट आणि बॉलच्या साह्याने कोर्टवर खेळले जाणारे प्रकार, सायकलिंग असे खेळ निवडावेत.

प्रकृतीनुसार व्यायाम 7 एप्रिल २००८ (सकाळ )

आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ असे व्यक्तींच्या प्रकृतीचे तीन प्रकार सांगितले आहेत। या तिन्ही प्रकारच्या व्यक्तींचे आरोग्य वेगळे असते, त्यामुळे त्यांच्यासाठी व्यायाम आणि औषधेही त्यांच्या प्रकृतीनुसार बदलावी लागतात. वात प्रकृतीच्या व्यक्तींना शास्त्रानुसार कोणत्या व्यायाम प्रकारांची शिफारस केली जाते ते पाहू. 1) चपळता आणि वेग असणारे व्यायाम प्रकार हे या व्यक्तींसाठी लाभदायक मानली जातात. व्यायाम कमी आणि खेळ अधिक असलेले प्रकार अशा व्यक्तींना आवडतातही. चालणे, धावणे (सौम्यपणे), सायकल चालविणे, पोहणे, दीर्घकाळ दूरपर्यंत चालणे (हायकिंग), योगासने अशा व्यायाम प्रकारांची वात प्रकृतीच्या व्यक्तींसाठी शिफारस केली जाते. मात्र त्यांना ऍरोबिक्‍स, जिम्नॅस्टिक, नृत्य असे प्रकारही अधिक उपयोगी ठरतात. व्यायामशाळेतील (जिम) कठीण व्यायाम, ज्यामुळे स्नायूंना अधिक ताण पडतो, असे प्रकार या व्यक्तींनी टाळलेलेच बरे.

श्‍वासोच्छ्वास तंत्र (5 एप्रिल २००८-- सकाळ )

काही वेळा एखाद्या अनामिक भीतीमुळे मनावर सतत एक प्रकारचा ताण जाणवत असेल किंवा नैराश्‍य (डिप्रेशन), डोकेदुखी असे विकार असतील, तर त्यावर श्‍वासोच्छ्वासाच्या तंत्रातून (ब्रीदिंग टेक्‍निक) शंभर टक्के परिणामकारक उपाय साधता येऊ शकतो. या तंत्रातून शरीरातील ऑक्‍सिजन आणि ऊर्जेची गरज पूर्ण होते. एखाद्या शांत जागेवर आरामदायी अवस्थेत ताठ बसून दररोज किमान अर्धा तास दीर्घ श्‍वसन केले, तरी अनेक विकार दूर राहतात. या श्‍वसन घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रयेवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. सुरवातीला हे कठीण वाटले, तरी हळूहळू ते साध्य होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 99 टक्के विकार हे शरीरातील ऑक्‍सिजनच्या कमतरतेतून निर्माण होतात. त्यामुळे सध्या तुमच्या रक्ताची सामू (पीएच) पातळी काय आणि ऑक्‍सिजनची किती गरज आहे, हे यावरून लक्षात येईल. या श्‍वासोच्छ्वास तंत्रामुळे ही ऑक्‍सिजनची संपूर्ण गरज पूर्ण होते आणि मनाला ताजेपणा जाणवत

Wednesday, April 16, 2008

इन्स्टंट रिलॅक्‍सर (11 एप्रिल २००८- सकाळ)

सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या धावपळीत मानसिक आरोग्याकडे बहुतेकांचे दुर्लक्ष होते आहे। शरीर आणि मनाचा अतिशय जवळचा संबंध अतो. जेव्हा मनाकडे दुर्लक्ष होते, तेव्हा त्याचा अतिरेक होऊन शरीरावर विपरीत परिणाम होण्यास सुरवात होते, तेव्हा सगळे जागे होतात. दैनंदिन कामांमध्ये मानसिक आरामही घ्यावा लागतो (विशेषतः बौद्धिक काम करताना) याचा बहुतेकांना विसर पडला आहे. हा तीन-चार मिनिटांचाही (दर तीन तासाला) आराम, पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी पुरेसा असतो. इझी ब्रीदिंग (केवळ श्‍वासोच्छ्वासाच्या लयीवर लक्ष केंद्रित करणे), डीप ब्रीदिंग (दीर्घ श्‍वास), श्‍वासोच्छ्वासाची अतिसंथ लय ठेवणे, अशा तंत्राचा दररोज तीन-चार मिनिटे वापर करून मानसिक आराम आणि शारीरिक ऊर्जाही मिळवू शकता. एका नाकपुडीतून श्‍वास आत घेत आहात आणि दुसऱ्या नाकपुडीतून सोडत आहात, असा केवळ विचार करून चालू लयीवर लक्ष दिले तरीही दोन मिनिटात "फ्रेश' वाटेल.

"इझी ब्रीदिंग' (10 एप्रिल २००८ -सकाळ)

श्‍वासोच्छ्वासात कोणताही बदल न करता, त्याकडे केवळ लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही "रिलॅक्‍स' होऊ शकता, यावर अनेकांचा विश्‍वास बसत नाही। पण हे खरे आहे. तुम्ही याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्या. तुम्ही जेव्हा गर्दीत असता किंवा कोठे तरी रांगेत उभे असता तेव्हा सतत काहीतरी "सिस्टिम' विरोधात प्रतक्रिया देऊन आपलाच संताप वाढवीत असतात. त्यामुळे काहीही बदलत नसते, मात्र उलट तुमच्या आरोग्यात बदल होतो. विशेषतः रागीट, तापट व्यक्तींमध्ये अशाच छोट्या छोट्या घटनांमधून मानसिक विकाराची सुरवात होते. त्यासाठी तुम्ही कोठेही असा, जेव्हा तुम्हाला असे वाटेल आपल्यात चिडचिडेपणा वाढला आहे, तेव्हा श्‍वासोच्छ्वासाकडे लक्ष केंद्रित करा. श्‍वास जसा चालू आहे, त्याच लयीमध्ये तुम्ही सामील व्हा. श्‍वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर केवळ एक सेकंद श्‍वसनक्रिया थांबवा आणि चमत्कार पहा. तुम्ही दोन मिनिटांत सर्वसाधारण पातळीवर आलेले असाल.

"कफ' प्रकृतीसाठी व्यायाम (9 एप्रिल २००८- सकाळ)

कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये मुळातच सहनशक्ती अधिक असते। कोणतीही गोष्ट सहजपणे घेणे, हा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे या व्यक्ती अतिताणतणावाच्या परिस्थितीतही खूप शांतपणे काम करू शकतात. म्हणून अशा व्यक्तींना अतिजड व्यायामाची (जिम वर्क आऊट) शिफारस केली जाते. मात्र त्याबरोबर शरीरात स्फूर्ती टिकून राहिल, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी खेळ वर्गीय प्रकार म्हणजे धावणे (लांब पल्ला उदा. मॅरेथॉन), स्वीमिंग, टेनिस, ऍरोबिक्‍स, जिम्नॅस्टिक्‍स, सायकलिंग (लांब पल्ला) त्यांना अधिक फायदेशीर ठरतात. स्नायूंच्या अधिक वाढीसाठी अतिजड व्यायाम (किंवा शरीरसौष्ठवसाठी) करण्याच्या प्रयत्नातून या व्यक्ती उच्च कामगिरी पार पाडू शकतात. पण अतिजड व्यायाम करून संपूर्ण थकून जाण्यापेक्षा व्यायाम आणि खेळ याचा मिलाफ सामान्यांना केव्हाही लाभ दायकच. बेसबॉल, फुटबॉल, हॉकी, तिरंदाजी, अश्‍वारोहण अशा खेळांतही कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी रस दाखवावा.

पित्तप्रकृतीसाठी व्यायाम (8 एप्रिल २००८- सकाल )

आयुर्वेदात पित्तप्रकृतीच्या व्यक्ती कायम "हॉट' असतात। त्यांच्या शरीराचे तापमान हे वात प्रकृतीच्या व्यक्तींपेक्षा थोडेसे अधिक असते. यांचे नाक आणि डोळे अधिक तीक्ष्ण असतात. अशा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी व्यायाम कशा प्रकारे करावेत, याबाबत या काही टिप्स.1) या व्यक्तींचा दम (स्टॅमिना), ताकद आणि वेग वाढविणारे खेळ किंवा व्यायाम प्रकार निवडण्यास अधिक फायदेशीर ठरते. 2) रॉक क्‍लायंबिंग, स्काय डायव्हिंग, आईस स्केटिंग, वेट लिफ्टिंग, स्वीमिंग अशा प्रकारांमध्ये पित्त प्रकृतीच्या व्यक्ती अधिक एकाग्रतेने कार्य करीत असतात. 3) मात्र पित्तप्रकृतीच्या व्यक्तीने शरीरातील ऊर्जा (हीट) संतुलित करण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. किंबहुना ही ऊर्जा कमी करणारे (कूलिंग स्पोर्टस) प्रकार निवडल्यास उपयोगी ठरतात. अनेकांना कठीण व्यायामाचा कंटाळा येतो, त्यांनी स्किईंग, स्वीमिंग, रॅकेट आणि बॉलच्या साह्याने कोर्टवर खेळले जाणारे प्रकार, सायकलिंग असे खेळ निवडावेत

प्रकृतीनुसार व्यायाम (7 एप्रिल २००८- सकाल)

आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ असे व्यक्तींच्या प्रकृतीचे तीन प्रकार सांगितले आहेत। या तिन्ही प्रकारच्या व्यक्तींचे आरोग्य वेगळे असते, त्यामुळे त्यांच्यासाठी व्यायाम आणि औषधेही त्यांच्या प्रकृतीनुसार बदलावी लागतात. वात प्रकृतीच्या व्यक्तींना शास्त्रानुसार कोणत्या व्यायाम प्रकारांची शिफारस केली जाते ते पाहू. 1) चपळता आणि वेग असणारे व्यायाम प्रकार हे या व्यक्तींसाठी लाभदायक मानली जातात. व्यायाम कमी आणि खेळ अधिक असलेले प्रकार अशा व्यक्तींना आवडतातही. चालणे, धावणे (सौम्यपणे), सायकल चालविणे, पोहणे, दीर्घकाळ दूरपर्यंत चालणे (हायकिंग), योगासने अशा व्यायाम प्रकारांची वात प्रकृतीच्या व्यक्तींसाठी शिफारस केली जाते. मात्र त्यांना ऍरोबिक्‍स, जिम्नॅस्टिक, नृत्य असे प्रकारही अधिक उपयोगी ठरतात. व्यायामशाळेतील (जिम) कठीण व्यायाम, ज्यामुळे स्नायूंना अधिक ताण पडतो, असे प्रकार या व्यक्तींनी टाळलेलेच बरे.

श्‍वासोच्छ्वास तंत्र (5 एप्रिल २००८- सकाल)

काही वेळा एखाद्या अनामिक भीतीमुळे मनावर सतत एक प्रकारचा ताण जाणवत असेल किंवा नैराश्‍य (डिप्रेशन), डोकेदुखी असे विकार असतील, तर त्यावर श्‍वासोच्छ्वासाच्या तंत्रातून (ब्रीदिंग टेक्‍निक) शंभर टक्के परिणामकारक उपाय साधता येऊ शकतो। या तंत्रातून शरीरातील ऑक्‍सिजन आणि ऊर्जेची गरज पूर्ण होते. एखाद्या शांत जागेवर आरामदायी अवस्थेत ताठ बसून दररोज किमान अर्धा तास दीर्घ श्‍वसन केले, तरी अनेक विकार दूर राहतात. या श्‍वसन घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रयेवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. सुरवातीला हे कठीण वाटले, तरी हळूहळू ते साध्य होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 99 टक्के विकार हे शरीरातील ऑक्‍सिजनच्या कमतरतेतून निर्माण होतात. त्यामुळे सध्या तुमच्या रक्ताची सामू (पीएच) पातळी काय आणि ऑक्‍सिजनची किती गरज आहे, हे यावरून लक्षात येईल. या श्‍वासोच्छ्वास तंत्रामुळे ही ऑक्‍सिजनची संपूर्ण गरज पूर्ण होते आणि मनाला ताजेपणा जाणवते.

नैराश्‍य टाळण्यासाठी...( 4 एप्रिल २००८- सकाल)

नैराश्‍य (डिप्रेशन) असलेल्या व्यक्तींमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसतात। एकाग्रता साधण्यास अडचणी, संपूर्ण निराशा, सतत आत्महत्येचे विचार येणे, अशी टोकाची लक्षणेही दिसायला लागतात. त्यातून लवकर बाहेर येण्यासाठी काही टिप्स ः 1) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्याला डिप्रेशन आले आहे, हे मान्य करणे, त्यानंतरच त्यावरील उपायांचा अधिक परिणाम दिसायला लागेल. 2) नियमित प्राणायाम करणे किंवा एरोबिक्‍ससारखे व्यायाम प्रकार करावेत (उदा.- पोहणे, धावणे इ.) 3) सतत कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करावा. 4) या काळात शांतपणे एकटे राहावे, असे वाटत असले, तरी ते टाळावे, कारण एकटेपणात अशा
अवस्थेत व्यक्ती आठवणीने व्याकुळ होतो. 5) जीवनसत्त्व ब-6 (उदा.- बिया, अंडी, मांस आदी पदार्थांत आढळते), फॉलिक ऍसिड याचे सेवन वाढवावे. 6) मित्रांसह आवडीच्या ठिकाणी फिरायला जाणेही प्रकृतीला उत्तम.

नाराशावर मात (3 एप्रिल २००८- सकाल)

नैराश्‍यावर मातप्रत्येकाच्या आयुष्यात दुःखद, वेदनादायक गोष्टी घडत असतात। अशा व्यक्तींमध्ये राग, चिडचिडेपणा, द्विधा मनःस्थिती आढळते। पण हीच स्थिती अधिक काळ राहिली, तर मात्र त्याला डिप्रेशन (नैराश्‍य) म्हणतात। याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो। आवडीच्या व्यक्तीचा विरह, प्रियजनाचे निधन, किंवा खाद्यपदार्थाची ऍलर्जी, मधुमेह अशा विशिष्ट परिस्थितीत स्वतःला असहाय समजणाऱ्या, आत्मविश्‍वास गमावलेल्या, एकाकी व्यक्तींमध्ये डिप्रेशन येते. कुठल्याही कामातून रस नाहीसा होणे, सतत रडणे, खूप कमी खाणे किंवा खूप अधिक खाणे, झोप कमी होणे किंवा न लागणे, शरीरातील ऊर्जा नसल्यासारखी वाटणे, अशी लक्षणे या व्यक्तींमध्ये दिसतात. अशा व्यक्तींना या गंभीर परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे मित्र आणि वैद्यकीय उपचार महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. त्याबाबत उद्याच्या अंकात सविस्तरपणे.

संगीतमय रिलॅक्‍सेशन (2 एप्रिल २००८- सकाल )

ःदिवसभर काम करून संध्याकाळी जेव्हा घरी परततो तेव्हा अंगातील संपूर्ण त्राण गेलेले असते। अशा वेळी रिफ्रेश करणाऱ्या या टिप्स- 1) संगीतामुळे काही मिनिटांत मनाला उभारी मिळते; पण त्यासाठी योग्य प्रकारच्या संगीताची निवड करता आली पाहिजे. काही मिनिटे संगीत ऐकून पुन्हा शारीरिक कामाला लागायचे असेल, तर जोशपूर्ण, ताल धरायला लावणारे संगीत ऐकले पाहिजे. याउलट बौद्धिक काम करायचे असेल तर शांत, नादमय आवडीचे संगीत ऐकले पाहिजे. 2) एखाद्या जोशपूर्ण गाण्यावर किंवा लोक
संगीताच्या तालावर बंद खोलीत संपूर्ण भान हरपून जसं येईल तसे नाचलात, तर अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत अगदी मस्तपैकी फ्रेश वाटायला लागेल. हा प्रयोग अनेकांच्या बाबतीत अत्यंत उपयोगी ठरला आहे. दोन-तीनदा जरी हा प्रयोग केला तरी शरीरात आणि मनातही एक वेगळा फ्रेशनेस अनुभवास येईल.

Sunday, April 13, 2008

रिलॅक्सेशन

संगीत उपचार पद्धतीएखाद्या अचानक घडलेल्या घटनेचा मानसिक धक्का (विशेषतः भावनेचा उद्रेक होऊन सतत रडणे किंवा हसणे) बसलेल्या व्यक्तीला दरबारी कानडा आणि पूरिया रागांच्या साहाय्याने सर्वसाधारण पातळीवर आणता येते। तर उच्च रक्तदाब असलेल्या (हायपरटेन्शन) व्यक्तींसाठी अहिरभैरव, पूरिया आणि तोडी राग उत्कृष्ट असल्याचं सिद्ध झाले आहे. विकलांग मुलांवर विविध राग आणि तालांच्या योग्य मिलाफातून उत्तम परिणाम साधता येतो, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. डोकेदुखी दूर करून शरीरात तरतरी आणण्यासाठी दरबारी कानडा, जयजयवंती आणि सोहनी रागांची शिफारस केली जाते तर दीप (ऍसिडिटी), गुणकली आणि जौनपुरी (अत्यंत थकवा, चेहरा पांढरा पडणे, गलितगात्र होणे आदी विकारांवर) तर मालकंस (ताप कमी करण्यासाठी)
उपयोगी ठरत असल्याचे डॉ। टी. साईराम यांनी प्रयोगातून सिद्द केले आहे.