Sunday, April 27, 2008

हिरा है सदा के लिए... (२० अक्टोबर २००७- सकाळ )


दागिने- तेही सोन्या-चांदीचे... हा ट्रेंडच बदलून गेलाय। सध्याचा तरुणांचा कल हिऱ्यांच्या दागिन्यांकडे अधिक। काही वर्षांपूर्वी सोन्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या स्त्रियाही हिऱ्यांच्या दागिन्यांचा हट्ट करताना दिसतात। आपल्या आवडीच्या व्यक्तीला ब्रॅंडेड हिऱ्याच्या दागिन्याचीच भेट देऊन, एखादा प्रेमळ धक्का द्यावा, हे तरुण मनाचे स्वप्न। यापूर्वी हिऱ्यांचे दागिने पाहण्यासही मिळत नसत। पण देश जसा तरुण (तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे बरं का!) झाला, तसा संपूर्ण बाजार बदलला।यापूर्वी सर्व खरेदी संपूर्ण विश्‍वासावर चालायची. त्या वेळी हिऱ्याची पारख करणारा, खरा सराफ म्हणून ओळखला जाई. पण आता कॅरोटोमीटरच्या साहाय्याने आपण घेत असलेला हिऱ्याचा दागिना आणि त्याची गुणवत्ता, दर्जा लगेच कळतो. त्यात दागिन्यांचा इन्शुरन्स कंपन्यांकडून दिला जात असल्यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होते. खरेदीच्या या मूलभूत घटकांबरोबरच दागिन्यांच्या डिझाईनमध्ये प्रचंड प्रकार आहेत. तुम्हाला हवे तसे, हवे तिथे. हिऱ्यांचे दागिने देण्याची कंपनीची तयारी असते. एवढंच काय, तर काही कंपन्या तुमच्या दागिन्यांची डिझाईन तुम्हीच करा, तसे दागिने आम्ही तयार करून देऊ, असा एक "ऑप्शन' समोर ठेवतात. एवढ्या सर्व गर्दीतून आपल्याला आवडीचा दागिना घ्यायचा, म्हणजे त्याला सौंदर्य दृष्टीनं नटलेलं तरुण मन हवं. बरं तो दागिना स्वतःसाठी खरेदी करावयाचा असेल तर निवड करण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. पण तो भेट द्यायचा असेल तर... उफ!...ते मात्र तुम्हीच ठरवा.

हिऱ्यांच्या दागिन्यांचे
प्रकारहिऱ्यांच्या दागिन्यांत प्रकार तरी किती। सर्व पारंपरिक दागिन्यांमध्ये हिऱ्यांना स्थान देण्यासाठी आणि ते लोकप्रिय करण्यासाठी ज्वेलर्स दिवसरात्र झटत असतात। पेडंट्‌स, नेकलेस, इअरिंग्ज, रिंगज्‌, ब्रासलेट या ढोबळ प्रकारांमध्ये दररोज एका नवीन डिझाईनची भर पडतेय. आता केवळ पेडंट्‌समध्ये क्रॉस, हर्ट, ड्रॉप, तर इअरिंग्जमध्ये स्टड, हुप, ड्रॉप, कंन्टंप्रेरी. बापरे... रिंग्जमध्ये पुन्हा गोल हिरा, चौकोनी हिरा इथपासून ते एन्गेजमेंट रिंग, इटरनिटी रिंग, ट्रॉयलॉजी, ड्रेस, वेडिंग रिंग ...ब्रासलेटमध्ये टेनिस, बॅंगल, कंटेंप्ररी...इ.



आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्‌स
सध्या भारतात जोरदार जाहिरातींसह किमान 27 वेगवेगळे आंतरराष्ट्रीय ब्रॅंड उपलब्ध आहेत। त्यात तनिष्कपासून ते नक्षत्र, आष्मि, संगिनी, ट्राय, सेन्टो, सत्त्व, प्रिंसेस प्लस, कपीओ, डिझाईन कट, प्रिस्टाइन हर्ट, केअरसा, लिली डायमंड, क्रिस कट, स्टार 129, क्वीन ऑफ हर्टस, रॉयल अशेर, हर्टस्‌ ऑन फायर, इलरा, लवमार्क, अशोका, लुसिडा, किमोरा, महाराजा, अडोरा, गिली।





संभाजी देशमुख

No comments: