सौंदर्य हे स्त्रियांचे सामर्थ्य आणि सामर्थ्य हे पुरुषांचे सौंदर्य, असं म्हणतात। पण ते आता अर्धवट खरं म्हणायला हवं। कारण सध्या अशी काही कार्यक्षेत्रं निर्माण झाली आहेत, ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांच्याही सौंदर्याला अधिक महत्त्व आलं आहे। जाहिरात क्षेत्रापासून हवाई कंपन्यांसह स्टार हॉटेलांमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येकाची सुंदर दिसणं ही गरज झाली आहे। कलाकारांना सध्या चित्रपटांपेक्षा जाहिरातीतून अधिक उत्त्पन्न मिळू लागले आहे। कलाकाराच्या अभिनयकौशल्यापेक्षा त्याच्या दिसण्याला महत्त्व आले। आणि म्हणूनच सध्या स्त्री आणि पुरुषांना आपलं सौंदर्य टिकविण्याची आणि ते वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे। या गरजेतूनच कॉस्मेटिक सर्जरी करून कृत्रिम आणि नैसर्गिक सौंदर्याचा योग्य मिलाफ साधण्याचं प्रमाण वाढलं आहे। विशेषतः नोकरी करणाऱ्या तीस ते चाळीस वर्षं वयादरम्यानच्या स्त्रियांमध्ये हे प्रमाण अधिक आहे। कॉस्मेटिक सर्जरीचे अनेक प्रकार आहेत। साधारणपणे अधिक वेळ न लागणारी आणि दुष्परिणाम नसलेल्या सर्जरीला स्त्रियांची पसंती असते। एका सर्वेक्षणानुसार मुंबई, बंगळूर, दिल्ली या मेट्रो सिटींमध्ये हे प्रमाण वाढलेले आहेच; पण गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातही कॉस्मेटिक सर्जरी करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. केवळ नोकरी करणारे स्त्री-पुरुषच कॉस्मेटिक सर्जरी करून घेतात, असा तुमचा समज अल तर तो साफ चुकीचा आहे. यात अनेक उद्योगपती आणि गृहिणींचाही समावेश आहे. गृहिणी असलेल्या ऊर्मिला शर्मा म्हणाल्या, ""वेगवेगळ्या समारंभांना पतीसोबत मला जावं लागतं. काही वेळा मी परदेशातही गेले आहे. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी मी ही ट्रिटमेंट घेण्यास सुरवात केली. आफ्टर ऑल ब्यूटी इज ब्यूटी...''चेहऱ्यावरील वाढलेल्या सुरकुत्या बोटक्स ट्रिटमेंटद्वारे अवघ्या चोवीस तासांत नाहीशा करता येतात. उश्रीीींळवर्ळीा ईीीेंश्रळर्पीा नावाच्या बॅक्टेरियाकडून निर्माण केलेल्या ईीीेंश्रळर्पीा ीुेंळप ढूशि अ या रसायनाच्या शुद्ध प्रकारालाच बोटक्स (ईुें) म्हणतात. हे एक औषधी उत्पादन आहे. या ट्रिटमेंटमध्ये इंजक्शनद्वारे हे रसायन चेहऱ्यावरील ज्या भागावरच्या सुरकुत्या नाहीशा करावयाच्या आहेत, तेथील मांसल (रक्तवाहिन्यांमध्ये नाही) भागात दिले जाते. अवघ्या पंधरा मिनिटांत ही ट्रिटमेंट पूर्ण केली जाते. त्यानंतर संपूर्ण परिणाम दिसण्यासाठी चोवीस तासांपासून सात दिवसांपर्यंतचा काळ लागतो. नाक अणि गाल यामध्ये दिसणाऱ्या सुरकुत्या, किंवा दोन भुवयांमधील सुरकुत्या, अथवा गालावरील खळीसुद्धा काही वेळा चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा आणते. हे सर्व दोष या बोटक्स ट्रिटमेंटद्वारे दूर केले जातात. याने चेहरा अगदी तजेलदार दिसायला लागतो. मात्र ही ट्रिटमेंट तात्पुरत्या स्वरूपाची असून, ती तीन ते चार महिने टिकून राहते. एका वेळी साधारणपणे पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत याचा खर्च येतो. पुन्हा परत त्या सुरकुत्या घालविण्यासाठी ही ट्रिटमेंट घ्यावी लागते. सध्या बहुतेक शहरांमध्ये विविध कंपन्यांचे ब्यूटी क्लिनिक सुरू झाले आहेत. त्या सर्व शाखांमधून ही ट्रिटमेंट केली जाते. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच ही ट्रिटमेंट करून घेणे उत्तम. कॉस्मेटिक सर्जन डॉ. पराग सहस्रबुद्धे म्हणाले, ""सध्या पुण्यात कॉस्मेटिक सर्जरी करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण चेहऱ्यावरील सुरकुत्यांबाबत समस्या घेऊन येतात. तेव्हा त्यांना ही ट्रिटमेंट सागितली जाते. याउलट अनेक स्त्रिया स्वतःच या ट्रिटमेंटची मागणी करतात. पण या ट्रिटमेंटमध्ये रसायनाचा खूप काळजीपूर्वक वापर हवा.'' कोणत्याही ब्यूटी ट्रिटमेंटमध्ये रसायनाचा अधिक वापर झाल्यास ऍलर्जी किंवा चेहऱ्याच्या पॅरॅलिसिससारख्या परिणामांची शक्यता असते.
बोटक्स ट्रीटमेंट...
- चेहऱ्यावरील सुरकत्यांवर ही ट्रीटमेंट उपयोगी
- अवघ्या पंधरा मिनिटांत पूर्ण- तीन ते चार महिने परिणामकारक
- तीनशेपासून दोन हजार रुपयांपर्यत खर्च
- यात रसायनांचे प्रमाण योग्यच हवे
संभाजी देशमुख
Sunday, April 27, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment