Wednesday, April 16, 2008

संगीतमय रिलॅक्‍सेशन (2 एप्रिल २००८- सकाल )

ःदिवसभर काम करून संध्याकाळी जेव्हा घरी परततो तेव्हा अंगातील संपूर्ण त्राण गेलेले असते। अशा वेळी रिफ्रेश करणाऱ्या या टिप्स- 1) संगीतामुळे काही मिनिटांत मनाला उभारी मिळते; पण त्यासाठी योग्य प्रकारच्या संगीताची निवड करता आली पाहिजे. काही मिनिटे संगीत ऐकून पुन्हा शारीरिक कामाला लागायचे असेल, तर जोशपूर्ण, ताल धरायला लावणारे संगीत ऐकले पाहिजे. याउलट बौद्धिक काम करायचे असेल तर शांत, नादमय आवडीचे संगीत ऐकले पाहिजे. 2) एखाद्या जोशपूर्ण गाण्यावर किंवा लोक
संगीताच्या तालावर बंद खोलीत संपूर्ण भान हरपून जसं येईल तसे नाचलात, तर अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत अगदी मस्तपैकी फ्रेश वाटायला लागेल. हा प्रयोग अनेकांच्या बाबतीत अत्यंत उपयोगी ठरला आहे. दोन-तीनदा जरी हा प्रयोग केला तरी शरीरात आणि मनातही एक वेगळा फ्रेशनेस अनुभवास येईल.

No comments: