नैराश्यावर मातप्रत्येकाच्या आयुष्यात दुःखद, वेदनादायक गोष्टी घडत असतात। अशा व्यक्तींमध्ये राग, चिडचिडेपणा, द्विधा मनःस्थिती आढळते। पण हीच स्थिती अधिक काळ राहिली, तर मात्र त्याला डिप्रेशन (नैराश्य) म्हणतात। याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो। आवडीच्या व्यक्तीचा विरह, प्रियजनाचे निधन, किंवा खाद्यपदार्थाची ऍलर्जी, मधुमेह अशा विशिष्ट परिस्थितीत स्वतःला असहाय समजणाऱ्या, आत्मविश्वास गमावलेल्या, एकाकी व्यक्तींमध्ये डिप्रेशन येते. कुठल्याही कामातून रस नाहीसा होणे, सतत रडणे, खूप कमी खाणे किंवा खूप अधिक खाणे, झोप कमी होणे किंवा न लागणे, शरीरातील ऊर्जा नसल्यासारखी वाटणे, अशी लक्षणे या व्यक्तींमध्ये दिसतात. अशा व्यक्तींना या गंभीर परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे मित्र आणि वैद्यकीय उपचार महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. त्याबाबत उद्याच्या अंकात सविस्तरपणे.
No comments:
Post a Comment