Wednesday, April 16, 2008

"कफ' प्रकृतीसाठी व्यायाम (9 एप्रिल २००८- सकाळ)

कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये मुळातच सहनशक्ती अधिक असते। कोणतीही गोष्ट सहजपणे घेणे, हा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे या व्यक्ती अतिताणतणावाच्या परिस्थितीतही खूप शांतपणे काम करू शकतात. म्हणून अशा व्यक्तींना अतिजड व्यायामाची (जिम वर्क आऊट) शिफारस केली जाते. मात्र त्याबरोबर शरीरात स्फूर्ती टिकून राहिल, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी खेळ वर्गीय प्रकार म्हणजे धावणे (लांब पल्ला उदा. मॅरेथॉन), स्वीमिंग, टेनिस, ऍरोबिक्‍स, जिम्नॅस्टिक्‍स, सायकलिंग (लांब पल्ला) त्यांना अधिक फायदेशीर ठरतात. स्नायूंच्या अधिक वाढीसाठी अतिजड व्यायाम (किंवा शरीरसौष्ठवसाठी) करण्याच्या प्रयत्नातून या व्यक्ती उच्च कामगिरी पार पाडू शकतात. पण अतिजड व्यायाम करून संपूर्ण थकून जाण्यापेक्षा व्यायाम आणि खेळ याचा मिलाफ सामान्यांना केव्हाही लाभ दायकच. बेसबॉल, फुटबॉल, हॉकी, तिरंदाजी, अश्‍वारोहण अशा खेळांतही कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी रस दाखवावा.

No comments: