Wednesday, April 16, 2008
इन्स्टंट रिलॅक्सर (11 एप्रिल २००८- सकाळ)
सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या धावपळीत मानसिक आरोग्याकडे बहुतेकांचे दुर्लक्ष होते आहे। शरीर आणि मनाचा अतिशय जवळचा संबंध अतो. जेव्हा मनाकडे दुर्लक्ष होते, तेव्हा त्याचा अतिरेक होऊन शरीरावर विपरीत परिणाम होण्यास सुरवात होते, तेव्हा सगळे जागे होतात. दैनंदिन कामांमध्ये मानसिक आरामही घ्यावा लागतो (विशेषतः बौद्धिक काम करताना) याचा बहुतेकांना विसर पडला आहे. हा तीन-चार मिनिटांचाही (दर तीन तासाला) आराम, पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी पुरेसा असतो. इझी ब्रीदिंग (केवळ श्वासोच्छ्वासाच्या लयीवर लक्ष केंद्रित करणे), डीप ब्रीदिंग (दीर्घ श्वास), श्वासोच्छ्वासाची अतिसंथ लय ठेवणे, अशा तंत्राचा दररोज तीन-चार मिनिटे वापर करून मानसिक आराम आणि शारीरिक ऊर्जाही मिळवू शकता. एका नाकपुडीतून श्वास आत घेत आहात आणि दुसऱ्या नाकपुडीतून सोडत आहात, असा केवळ विचार करून चालू लयीवर लक्ष दिले तरीही दोन मिनिटात "फ्रेश' वाटेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment