Wednesday, April 16, 2008

नैराश्‍य टाळण्यासाठी...( 4 एप्रिल २००८- सकाल)

नैराश्‍य (डिप्रेशन) असलेल्या व्यक्तींमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसतात। एकाग्रता साधण्यास अडचणी, संपूर्ण निराशा, सतत आत्महत्येचे विचार येणे, अशी टोकाची लक्षणेही दिसायला लागतात. त्यातून लवकर बाहेर येण्यासाठी काही टिप्स ः 1) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्याला डिप्रेशन आले आहे, हे मान्य करणे, त्यानंतरच त्यावरील उपायांचा अधिक परिणाम दिसायला लागेल. 2) नियमित प्राणायाम करणे किंवा एरोबिक्‍ससारखे व्यायाम प्रकार करावेत (उदा.- पोहणे, धावणे इ.) 3) सतत कार्यमग्न राहण्याचा प्रयत्न करावा. 4) या काळात शांतपणे एकटे राहावे, असे वाटत असले, तरी ते टाळावे, कारण एकटेपणात अशा
अवस्थेत व्यक्ती आठवणीने व्याकुळ होतो. 5) जीवनसत्त्व ब-6 (उदा.- बिया, अंडी, मांस आदी पदार्थांत आढळते), फॉलिक ऍसिड याचे सेवन वाढवावे. 6) मित्रांसह आवडीच्या ठिकाणी फिरायला जाणेही प्रकृतीला उत्तम.

No comments: