Wednesday, April 16, 2008

श्‍वासोच्छ्वास तंत्र (5 एप्रिल २००८- सकाल)

काही वेळा एखाद्या अनामिक भीतीमुळे मनावर सतत एक प्रकारचा ताण जाणवत असेल किंवा नैराश्‍य (डिप्रेशन), डोकेदुखी असे विकार असतील, तर त्यावर श्‍वासोच्छ्वासाच्या तंत्रातून (ब्रीदिंग टेक्‍निक) शंभर टक्के परिणामकारक उपाय साधता येऊ शकतो। या तंत्रातून शरीरातील ऑक्‍सिजन आणि ऊर्जेची गरज पूर्ण होते. एखाद्या शांत जागेवर आरामदायी अवस्थेत ताठ बसून दररोज किमान अर्धा तास दीर्घ श्‍वसन केले, तरी अनेक विकार दूर राहतात. या श्‍वसन घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रयेवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. सुरवातीला हे कठीण वाटले, तरी हळूहळू ते साध्य होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 99 टक्के विकार हे शरीरातील ऑक्‍सिजनच्या कमतरतेतून निर्माण होतात. त्यामुळे सध्या तुमच्या रक्ताची सामू (पीएच) पातळी काय आणि ऑक्‍सिजनची किती गरज आहे, हे यावरून लक्षात येईल. या श्‍वासोच्छ्वास तंत्रामुळे ही ऑक्‍सिजनची संपूर्ण गरज पूर्ण होते आणि मनाला ताजेपणा जाणवते.

No comments: