Monday, April 21, 2008

पित्तप्रकृतीसाठी व्यायाम 8 एप्रिल २००८ (सकाळ)

आयुर्वेदात पित्तप्रकृतीच्या व्यक्ती कायम "हॉट' असतात। त्यांच्या शरीराचे तापमान हे वात प्रकृतीच्या व्यक्तींपेक्षा थोडेसे अधिक असते. यांचे नाक आणि डोळे अधिक तीक्ष्ण असतात. अशा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी व्यायाम कशा प्रकारे करावेत, याबाबत या काही टिप्स.1) या व्यक्तींचा दम (स्टॅमिना), ताकद आणि वेग वाढविणारे खेळ किंवा व्यायाम प्रकार निवडण्यास अधिक फायदेशीर ठरते. 2) रॉक क्‍लायंबिंग, स्काय डायव्हिंग, आईस स्केटिंग, वेट लिफ्टिंग, स्वीमिंग अशा प्रकारांमध्ये पित्त प्रकृतीच्या व्यक्ती अधिक एकाग्रतेने कार्य करीत असतात. 3) मात्र पित्तप्रकृतीच्या व्यक्तीने शरीरातील ऊर्जा (हीट) संतुलित करण्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. किंबहुना ही ऊर्जा कमी करणारे (कूलिंग स्पोर्टस) प्रकार निवडल्यास उपयोगी ठरतात. अनेकांना कठीण व्यायामाचा कंटाळा येतो, त्यांनी स्किईंग, स्वीमिंग, रॅकेट आणि बॉलच्या साह्याने कोर्टवर खेळले जाणारे प्रकार, सायकलिंग असे खेळ निवडावेत.

No comments: