Wednesday, April 16, 2008

प्रकृतीनुसार व्यायाम (7 एप्रिल २००८- सकाल)

आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ असे व्यक्तींच्या प्रकृतीचे तीन प्रकार सांगितले आहेत। या तिन्ही प्रकारच्या व्यक्तींचे आरोग्य वेगळे असते, त्यामुळे त्यांच्यासाठी व्यायाम आणि औषधेही त्यांच्या प्रकृतीनुसार बदलावी लागतात. वात प्रकृतीच्या व्यक्तींना शास्त्रानुसार कोणत्या व्यायाम प्रकारांची शिफारस केली जाते ते पाहू. 1) चपळता आणि वेग असणारे व्यायाम प्रकार हे या व्यक्तींसाठी लाभदायक मानली जातात. व्यायाम कमी आणि खेळ अधिक असलेले प्रकार अशा व्यक्तींना आवडतातही. चालणे, धावणे (सौम्यपणे), सायकल चालविणे, पोहणे, दीर्घकाळ दूरपर्यंत चालणे (हायकिंग), योगासने अशा व्यायाम प्रकारांची वात प्रकृतीच्या व्यक्तींसाठी शिफारस केली जाते. मात्र त्यांना ऍरोबिक्‍स, जिम्नॅस्टिक, नृत्य असे प्रकारही अधिक उपयोगी ठरतात. व्यायामशाळेतील (जिम) कठीण व्यायाम, ज्यामुळे स्नायूंना अधिक ताण पडतो, असे प्रकार या व्यक्तींनी टाळलेलेच बरे.

No comments: