Wednesday, April 16, 2008

"इझी ब्रीदिंग' (10 एप्रिल २००८ -सकाळ)

श्‍वासोच्छ्वासात कोणताही बदल न करता, त्याकडे केवळ लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही "रिलॅक्‍स' होऊ शकता, यावर अनेकांचा विश्‍वास बसत नाही। पण हे खरे आहे. तुम्ही याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्या. तुम्ही जेव्हा गर्दीत असता किंवा कोठे तरी रांगेत उभे असता तेव्हा सतत काहीतरी "सिस्टिम' विरोधात प्रतक्रिया देऊन आपलाच संताप वाढवीत असतात. त्यामुळे काहीही बदलत नसते, मात्र उलट तुमच्या आरोग्यात बदल होतो. विशेषतः रागीट, तापट व्यक्तींमध्ये अशाच छोट्या छोट्या घटनांमधून मानसिक विकाराची सुरवात होते. त्यासाठी तुम्ही कोठेही असा, जेव्हा तुम्हाला असे वाटेल आपल्यात चिडचिडेपणा वाढला आहे, तेव्हा श्‍वासोच्छ्वासाकडे लक्ष केंद्रित करा. श्‍वास जसा चालू आहे, त्याच लयीमध्ये तुम्ही सामील व्हा. श्‍वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर केवळ एक सेकंद श्‍वसनक्रिया थांबवा आणि चमत्कार पहा. तुम्ही दोन मिनिटांत सर्वसाधारण पातळीवर आलेले असाल.

No comments: